Skip to content
IC4.health
IC4.health

  • Book Appointment
IC4.health
IC4.health

ANA test in marathi

ANA टेस्ट का केली जाते आणि पॉज़िटिव ANA टेस्ट चा काय अर्थ असतो? (ANA test in marathi)

Dr SM Akerkar, February 25, 2024February 25, 2024

तुमच्या डॉक्टरांनी  तुम्हाला ‘ANA चाचणी’ करायला संगिताली आहें  का?

तुमची ANA चाचणी पॉझिटिव्ह आली आहे का? 

ह्या ANA टेस्ट ने मनात भीती आणि अनिश्चितता नक्किच होऊ शकते. मला खात्री आहे की तुम्हाला ANA चाचणीबद्दल अधिक माहिती हवी आहे. चला तर; तपशीलवार ही चाचणी पाहू, स्पष्टीकरण मिळवू आणि सर्व सर्व शंका दूर करु. 

ANA चाचणीचा पूर्ण अर्थ काय आहे?

ANA चाचणी म्हणजे Antinuclear Antibody चाचणी.

ANA चाचणी कशासाठी केली जाते?

ANA (antinuclear antibody) चाचणी ऑटोइम्यून आजरांसाठी केली जाते. ही चाचणी शरीराच्या स्वतःच्या पेशींना लक्ष्य करणाऱ्या अँटीबॉडीज शोधण्यात मदत करते. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये थकवा, सांधेदुखी, पुरळ किंवा ताप यांसारखी स्वयंप्रतिकार स्थिती (ऑटोइम्यून आजार) दर्शविणारी लक्षणे दिसून येतात तेव्हा ही चाचणी केली जाते.

ऑटोइम्यून आजार म्हणजे नक्की काय असते?

ऑटोइम्यून रोग उद्भवतात जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्या पेशिंवर हल्ला करते. सामान्यतः, रोगप्रतिकारक प्रणाली (Immunity) जीवाणू आणि विषाणूंसारख्या हानिकारक आक्रमणकर्त्यांपासून शरीराचे रक्षण करते. तथापि, स्वयंप्रतिकार रोगांमध्ये (ऑटोइम्यून आजर), रोगप्रतिकारक प्रणाली निरोगी पेशी आणि हानिकारक जीवाणु मधील फरक समजु शकत नाही. रोगप्रतिकारक प्रणाली ऑटोअँटीबॉडीज तयार करते  ज्या शरीराच्या स्वतःच्या निरोगी पेशिंवर  हल्ला करतात, ज्यामुळे ऑटोइम्यून रोग होतात. संधिवात, ल्युपस, मल्टिपल स्क्लेरोसिस, टाइप 1 मधुमेह यासह 80 हून अधिक ऑटोइम्यून रोग आहेत.

ANA चाचणी कशी केली जाते?

ANA चाचणीमध्ये तुमच्या हातातील रक्तवाहिनीतून रक्त घेतले जाते. रक्ताची ही चाचणी कधिही केली जाऊ शकते; रिकाम्या पोटाची गरज नसते. त्यानंतर रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठवला जातो, जिथे अँटीन्यूक्लियर ऍन्टीबॉडीज साठी विश्लेषण केले जाते. परिणाम सामान्यतः टायटर (उदा., 1:40, 1:80) सोबत पैटर्न (उदा. होमॉजेनस, स्पेकल्ड ) असा दिला जातो.

ANA चाचणीसाठी विविध प्रकार आहेत का?

ANA चाचणी साधारणपणे दोन पद्धतींनी केली जाते- IFA (Indirect Immunofluorescence Assay) आणि EIA (Enzyme Immunoassay). IFA ही ANA चाचणीसाठी सर्वोत्तम पद्धत मानली जाते. नेहमी खात्री करा की तुमची ANA चाचणी IFA पद्धतीने केली जाईल कारण ती अधिक अचूक असते.

ANA चाचणी चा अहवाल कसा असतो?

ANA रिपोर्ट मध्ये दोन भाग असतात- टायटर (Titer) आणि पैटर्न (Pattern). 

टायटर – १:४०, १:८०, १:१६० असा नमुद केला जातो. टायटर जेवडा जास्त तेव्हडि चाचणी जास्त पॉज़िटिव मानली जाते। 

1:100 किंवा त्याहून कमी चाचणी नेगेटिव मानली जाते. 

पैटर्न – homogenous/ speckled असा नमुद केला जातो। पैटर्न संधिवात तज्ञाना (rheumatologist) ANA आणि ऑटोइम्यून रोग़ाबद्दल अधिक महिति पुरवतो. 

एएनए चाचणीचा अर्थ संधिवात तज्ञाद्वारे टायटर, पॅटर्न आणि व्यक्तीच्या लक्षणांवर आधारित लावला जातो.

पॉझिटिव्ह ANA चाचणी चा काय अर्थ असतो?

पॉझिटिव्ह ANA चाचणी रक्तात अंतिन्यूक्लियर अ‍ॅन्टिबॉडी असल्याचे सूचित करते. केवळ पॉझिटिव्ह ANA चाचणीने विशिष्ट ऑटोइम्यून रोगाचे निदान होत नाही. जर आपलि ANA चाचणी पॉज़िटिव असेल तर अचूक निदानासाठी रुमाटोलॉजिस्टचा सल्ला ज़रूर घ्या.

ANA चाचणी पॉझिटिव्ह असल्यास सांधेदुखी असु शकते का?

पॉझिटिव्ह ANA चाचणी ही संधिवात, ल्युपस किंवा स्क्लेरोडर्मा यांसारख्या सांध्यांवर परिणाम करणाऱ्या ऑटोइम्यून रोगाशी संबंधित आहे. पॉझिटिव्ह ANA चाचणी असलेल्या व्यक्तींनी अनुभवलेल्या सांधेदुखीचा त्रास सामान्यत: हया ऑटोइम्यून रोगामुळे होऊ शकतो.

कोणत्या ऑटोइम्यून रोगांमधे ANA चाचणी पॉझिटिव्ह असते?

ANA चाचणी ऑटोइम्यून रोगांमधे  पॉझिटिव्ह असते जसे की सिस्टेमिक ल्यूपस अरिथमेटोसुस (SLE), स्जोग्रेन्स सिंड्रोम, स्क्लेरोडर्मा, MCTD आणि UCTD. तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पॉझिटिव्ह ANA चाचणी ऑटोइम्यून रोग नसलेल्या व्यक्तींमध्ये किंवा निरोगी व्यक्तींमध्ये देखील आढळू शकते. तुमची ANA चाचणी पॉझिटिव्ह असल्यास निश्चित निदानासाठी कृपया संधिवात तज्ञाचा सल्ला ज़रूर घ्या.

ANA चाचणीची किंमत किती आहे?

प्रतिष्ठित प्रयोगशाळांमध्ये ANA चाचणीची किंमत रु. 900 ते रु. 1100 आहे.

आपलि ANA चाचणी पॉज़िटिव असल्यास, rhuematologist च्या सल्ला, मार्गदर्शान, अपॉंट्मेंटसाठी आमच्या वेब साइट ला ज़रूर भेंट द्या। 

डॉ. दिव्या लाला,

संधिवात तज्ञ (रुमाटोलॉजिस्ट),

IC4 संधिवात क्लिनिक,

कल्याण / बदलापूर

अस्वीकरण: या ब्लॉगचा मजकूर केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे आणि हा कोणत्याही वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. कृपया निश्चित निदान आणि उपचार करण्यासाठी रुमाटोलॉजिस्टशी संपर्क साधा.

Featured ANA test in marathiANA titer 1 320 म्हणजे काय?एएनए पॉझिटिव्ह म्हणजे काय?कोणत्या रोगांमुळे सकारात्मक ANA होतो?तुम्ही ANA titer परिणाम कसे वाचता?माझे ANA IFA सकारात्मक असल्यास याचा काय अर्थ होतो?मी ANA चाचणी कधी करावी?वेगवेगळ्या ANA चाचण्या काय आहेत?सकारात्मक ANA चे सर्वात सामान्य कारण काय आहे?सकारात्मक ANA म्हणजे काय?सकारात्मक RNP आणि ANA चाचणी म्हणजे काय?सामान्य अँटीन्यूक्लियर अँटीबॉडी चाचणी म्हणजे काय?

Post navigation

Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©2026 IC4.health | WordPress Theme by SuperbThemes